बालेवाडी :
बाणेर-बालेवाडी परिसरातील प्रमुख चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ममता चौकासह राधा चौक, ननावरे चौक, बाणेर स्मशानभूमी चौक आणि दसरा चौक येथे नवीन सिग्नल यंत्रणा बसविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. येत्या चार दिवसांत या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर बालेवाडी येथील ममता चौकात वाहतूक पोलीस निरीक्षक जगदाळे आणि पुणे महापालिका विद्युत विभागाचे अभियंता प्रल्हाद पवार यांच्या उपस्थितीत नवीन सिग्नल यंत्रणा बसविण्याच्या कामाची तसेच वाहतूक नियोजनाची पाहणी करण्यात आली.
बाणेर-बालेवाडी परिसरातील प्रमुख चौकांमध्ये वाढलेल्या वाहतुकीमुळे नागरिकांना सातत्याने कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी वाहतूक विभागाकडे करण्यात आली होती. या मागणीची तातडीने दखल घेत पुणे वाहतूक पोलीस विभाग आणि पुणे महापालिका विद्युत विभागाच्या माध्यमातून सिग्नल बसविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.



More Stories
*पेरीविंकल च्या बावधन, सूस, पिरंगुट,पौड, कोळवण व माले या सर्व शाखांमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी!!!*
सत्य, अहिंसा आणि देशसेवेचा संदेश; पेरिविंकल स्कूलमध्ये महात्मा गांधी- लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
बालेवाडी येथील राजाभाऊ गुडदे फाउंडेशन व भारती विद्यापीठ स्कूलचा स्तुत्य उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी एक पाऊल पुढे; ई-वेस्ट संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद