बाणेर :
मुरकुटे गार्डन येथे कार्यरत असलेल्या आनंदवन ज्येष्ठ नागरिक संघाला Expert Superspeciality Clinicतर्फे व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी तसेच आपत्कालीन परिस्थितीत गरजू रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलविणे सोयीचे व्हावे, या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आला.
मुरकुटे गार्डन येथे आनंदवन ज्येष्ठ नागरिक संघाचे सुमारे १५० ज्येष्ठ नागरिक नियमितपणे सहभागी होतात. दररोज सकाळी हास्य क्लब, विविध व्यायामप्रकार तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात.
बालेवाडी येथील Expert Superspeciality Clinicच्या वतीने ही व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. या क्लिनिकमध्ये डॉ. अक्षय काशिद – हृदयरोग तज्ज्ञ, डॉ. चिन्मय कुंभार – मेंदूरोग तज्ज्ञ आणि डॉ. प्रसाद भाटे – गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट हे तज्ज्ञ सेवा देतात.
या वेळी बाणेर-बालेवाडी मेडिकोस असोसिएशनचे संस्थापक डॉ. राजेश देशपांडे उपस्थित होते. आनंदवन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने श्री. अजय कदम यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत Expert Superspeciality Clinicतर्फे आनंदवन संघातील ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी ५०% सवलत देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
यावेळी महत्त्वाच्या आरोग्य व आपत्कालीन सेवांचे संपर्क क्रमांक उपलब्ध व्हावेत, यासाठी तयार करण्यात आलेल्या महत्त्वाच्या फोन नंबरच्या फलकाचे डॉक्टरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आपत्कालीन प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सेवा व मदत तातडीने मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानासाठी वैद्यकीय क्षेत्राने सामाजिक बांधिलकी जपावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.



More Stories
भारतीय महिला सॉफ्टबॉल संघात बाणेरच्या वैष्णवी सायकरची निवड; तैवानमधील आशियाई युनिव्हर्सिटी स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
ममता चौकासह बाणेर-बालेवाडीतील पाच चौकांत सिग्नल यंत्रणा; चार दिवसांत कार्यान्वित होणार, नगरसेवक अमोल बालवडकरांचा पुढाकार
*पेरीविंकल च्या बावधन, सूस, पिरंगुट,पौड, कोळवण व माले या सर्व शाखांमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी!!!*