August 16, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*तिरंगा उंच, राष्ट्राभिमान दुणावला! पेरीविंकल सूसमध्ये स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा*!!

सूस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सूस शाखा येथे आज शनिवार दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभक्ती, उत्साह आणि राष्ट्राभिमानाच्या वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी ध्वज पूजन व ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत आणि ध्वजगीताने राष्ट्रध्वजाला प्रणाम करून सर्वांमध्ये राष्ट्रीय एकात्मता दिसली. यावेळी प्रमुख पाहुणे मा. डॉ. श्री. अनिल गुंजाळ सर (समुपदेशक, व्याख्याते व शिक्षणतज्ज्ञ), श्री. संदीप ढमढेरे , डॉ. शेलार सर , श्री करंजावणे सर तसेच पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या प्रमुख प्राचार्या सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहाने सादर केले. 

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांनी, प्रभावी इंग्रजी व संस्कृत भाषणांनी तसेच आकर्षक देशभक्तिपर नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विविध स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. शाळेला मिळालेले “Golden School award” मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांना प्रदान करण्यात आले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी G.S. व L.R. यांची घोषणा करण्यात आली.

मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य, प्रामाणिकपणा आणि सजग नागरिकत्व यांचे महत्त्व पटवून दिले. “स्वतंत्र भारत म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे, तर जबाबदारी, कर्तव्य, शिस्त आणि नैतिक मूल्यांचे पालन करणारा भारत होय,” असे सांगत प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः प्रामाणिक, जबाबदार आणि जागरूक नागरिक बनण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख पाहुणे मा. श्री. अनिल गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करत जीवन कसे जगावे, याविषयी अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, गुणवत्ता जपणारा माणूसच खऱ्या अर्थाने यशस्वी आणि गुणवान असतो. चांगला माणूस बनणे हेच खरे शिक्षण आहे. विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये, आई-वडील, शिक्षक आणि निसर्ग यांनाच आपले खरे गुरु मानावे, शिस्त पाळावी, भ्रष्टाचार आणि जातीयतेपासून दूर राहावे तसेच प्रत्येकाने आपल्या परीने समाजसेवा करून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, संविधानाविषयी आदर, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव, शिस्त, प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ झाली.

कार्यक्रमाचा समारोप सर्वांनी एकमुखाने ‘वंदे मातरम्’ व *भारत माता की जय’* च्या घोषणांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रफुल्ल पाटील यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, डायरेक्टर सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल, शाळेच्या प्रमुख प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्याध्यापिका सौ. योगिता ढाणे यांच्या नेतृत्वाने समन्वयक श्री. सचिन खोडके आणि नेहा माळवदे तसेच सर्व शिक्षक यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. 

अशा प्रकारे विविध देशभक्तीपर आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी समृद्ध झालेला ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा “वंदे मातरम्”च्या सामूहिक गायनाने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रफुल्ला पाटील यांनी केले.