July 27, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथील पूनम विधाते यांचा शिवराज्यभिषेक दिनानिमित्त गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करत सावित्रीच्या लेकिंसाठी अभिनव उपक्रम

बाणेर :

बाणेर येथे वामा क्लब च्या अध्यक्ष पूनम विशाल विधाते यांच्या वतीने शिवराज्यभिषेक सोहळ्या निमित्त गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गरीब मुलींना शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून शिक्षणासाठी लागणाऱ्या शालो उपयोगी वस्तू त्यांनी उपलब्ध करून दिल्या

 

प्रजेचा सांभाळ पित्याप्रमाणे करणारे कनवाळू पिता होते, तसेच बंडखोर-फितुरांना देहदंडाची शिक्षा देणारे कर्तव्यकठोर, न्यायनिष्ठुर राजाही होते. शिवछत्रपती हे माणूस होते की नियतीला पडलेले पूर्णत्वाचे स्वप्न होते, कळत नाही. आपण त्यांच्यातील एक तरी गुण अंगीकारावा हीच शिवराज्याभिषेक सोहळा साजरी करण्याची सगळ्यात चांगली पद्धत असेल! छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कलेतून प्रेरणा घेऊन दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा प्रण करत आहे.ज्या स्वराज्यासाठी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं त्याच समाजातील सावित्रीच्या लेकींसाठी शालेय साहित्य वाटप करण्याचा प्रण वामा क्लब च्या पूनम विधाते यांनी केला आहे.

आपल्या परीसरात असंख्य गरीब मुली आहेत. त्यांना शिक्षणासाठी मदत आवश्यक असते. मी आव्हान करते की, ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी अशा गरजू मुलींना मदत करण्यासाठी पुढे यावे. त्यामूळे मुलींना शिक्षण घेण्यासाठी अडचण दूर होईल. शिवराज्यभिषेक सोहळ्या निमित्त आम्ही मुलींना शैक्षणिक मदतीसाठी सुरुवात केली आहे आपणही सहभागी व्हावे : पूनम विशाल विधाते(अध्यक्ष : वामा क्लब)

बाणेर बालेवाडी येथील महिलांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या पूनम विशाल विधाते महिलांसाठी मॅरेथॉन चे आयोजन करत महिलांच्या आरोग्यविषयी जनजागृती केली. आज त्या वामा क्लब च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं कार्य करत आहेत. आज शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं महिलांना शिक्षणाची दारं खुली व्हावीत म्हणून शालेय साहित्याचं वाटप केले. गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने त्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळण्यास मदत होईल. या प्रकल्पामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत जागरुकता येण्यास मदत होईल.

 

 

You may have missed