पुणे :
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या पुणे जिल्हा व शहर अध्यक्षपदाची बिनविरोध निवड करण्यात आली. पुणे शहर अध्यक्षपदी बाबा तारे यांची तर जिल्हाध्यक्षपदी सुनील लोणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या पुणे जिल्हा व संलग्न पुणे शहर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची मुदत मार्च २०२४ रोजी संपली होती.
नवीन कार्यकारिणी निवडीसाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे अध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव गणेश मोकाशी यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पत्रकार संघाच्या सदस्यांची बैठक १९ मे रोजी घेतली.पुणे जिल्हा पत्रकार संघाची निवड ही मतदान पद्धतीने घ्यावी की बिनविरोध पद्धतीने घ्यावी अशी चर्चा या बैठकीत झाली.या बैठकीत सर्व सदस्यांनी बिनविरोध निवडणुक घेण्यात यावी असा निर्णय घेतला. त्यामध्ये सर्व इच्छुकांचे अर्ज भरून घेण्यात आले व त्याचा निकाल ३ जून रोजी जाहीर करण्यात आला.
यामध्ये पुणे जिल्हाध्यक्षपदी सुनील लोणकर,पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदी श्रावणी कामत (मावळ) तर शहराध्यक्षपदी बाबा तारे यांची निवड एकमताने करण्यात आली.तसेच जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सुनीता कसबे, उपाध्यक्षपदी रमेश निकाळजे, जिल्हा संघटक चिराग फुलसुंदर व अनिल वडघुले, समन्वयक रेखा भेगडे (मावळ) यांची निवड करण्यात आली.या निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले जात आहे.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..