औंध :
औंध येथील भाले चौक ते मेडी पॉइंट पर्यंत रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या पुणे मनपा लाईट पोल वर असणाऱ्या अनधिकृत २२०० मीटर केबल वर आज दिनांक १/६/२०२४ रोजी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय विद्युत विभाग अंतर्गत कारवाई करण्यात आली.
या संपूर्ण रस्त्यावर असणाऱ्या विद्युत पोल वर मोठया प्रमाणात अनधिकृत केबल टाकल्याने विद्युत पोल वाकले जात आहेत. शिवाय रस्त्यावरील केबल मुळे अपघात होण्याची जास्त शक्यता असल्याने विद्युत विभागाच्या वतीने हि कारवाई करण्यात आली. सुमारे २२०० मीटर केबल काढण्यात आली.
सदर कारवाई मा. अधीक्षक अभियंता मनिषा शेकटकर , कार्यकारी अभियंता योगेश माळी, महापालिका सहायक आयुक्त मा गिरीश दापकेकर व उपअभियंता अशोक केदारी यांचे मार्गदर्शनाखाली व शाखा अभिंयता वैशाली भोईर यांच्या पथकामार्फत करण्यात आली.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..