पाषाण :
पाषाण सुसरोड विघ्नहर्ता चौक येथील लोकसेवा ई स्कूल मध्ये उद्या रविवार दि. २ जून रोजी दुपारी ३.३० वाजता मॉर्निंग ग्रुप पाषाण आणि विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी विनामूल्य करिअर संबंधी मार्गदर्शन आणि शिक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या संधी याविषयी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
नुकताच दहावी-बारावी परीक्षेचा निकाल लागला असुन विद्यार्थी आणि पालक यांच्यामधे पुढे काय करायला हवे याबद्दल संभ्रम निर्माण झालेला असतो. तो दूर व्हावा या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. म्हणुनच माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा फायदा घ्यावा व व्याख्यानास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*