May 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी ग्रामस्थ महिलांच्या वतीने जगद्गुरु तुकोबाराय 375 वा सदेह वैकुंठ गमन सोहळा निमित्त अन्न सेवेसाठी २५००० हजार चपाती रवाना..

पाषाण :

श्रीक्षेत्र सासवड जगद्गुरु तुकोबाराय 375 वा सदेह वैकुंठ गमन सोहळा निमित्त 24 मे ते 31 मे या दरम्यान भव्य दिव्य संगीत गाथा पारायण संपन्न होत आहे. या निमित्ताने या वेळी तिथे उपस्थित असणाऱ्या भाविकांना अन्न प्रसादाची सेवा व्हावी म्हणून पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीने महिलांच्या मदतीने 25000 चपाती अन्न दान सेवेसाठी पाठविण्यात आली.

 

या अन्न दान सेवेसाठी पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी गावातली महिलांचे मोलाचे योगदान राहिले. घराघरांतून महिलांनी जमेल तसे चपाती साठी योगदान दिले. यावेळी सांप्रदायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.