November 22, 2024

Samrajya Ladha

पेरीविंकलने दहावीच्या निकालाचा झेंडा रोवला !!! १० वी परीक्षेत पिरंगुट शाखेत १००% निकालाची परंपरा कायम !

पिरंगुट :

शालेय शिक्षणातील सर्वोच्च महत्वाची, आणि पुढील शिक्षणाच्या वाटचालीत महत्वाचा परिणामकारक घटक म्हणून दहावीची परीक्षा आणि त्यात मिळणार गुण हा कायमच अग्रणी रहाणारा मुद्दा आहे.

आपला एक वेगळा शिक्षण समूह स्थापन करून आपला दर्जा सातत्याने अग्रेसर ठेवण्याची परंपरा कायम राखण्यात प्रयत्नशील समूह म्हणजे पेरीविंकल. पेरीविंकल च्या पिरंगुट शाखेने या वर्षीही आपली १००% निकालाची परंपरा कायम राखली.

शाखेत सर्वप्रथम येण्याचा मान संचिता केसकर या विद्यार्थिनीने पटकावला. तिने 94.60% गुण मिळवले. तर दुस –या क्रमांकावर साबळे समृद्धी हिने 90.80% गुण मिळवले, तर बेलुंकी सानिया, खडके कृष्णा यांना 89.20% व गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

अशा या महत्वाच्या टप्प्यावरील परीक्षेत विद्यार्थ्याना तसेच समर्थ आणि सक्षम मार्गदर्शन मिळणेही तेवढेच गरजेचे आहे. असेच अभ्यासपूर्ण आणि सखोल मार्गदर्शन पेरीविंकल – पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले, माध्यमिक पर्यवेक्षिका पूनम पाढरे, तसेच १०वी चे सर्वच शिक्षक यांनी गेले वर्षभर केलेल्या प्रयत्नांच्या पराकास्थेचे हे फळ म्हणजे आजचा हा उज्ज्वल निकाल.

या सर्व प्रयत्नां बरोबरच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शाळा व्यवस्थापन. शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, तसेच संचालिका रेखा बांदल यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन या शाळा समुहातील सर्वच कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी एक आदर्शवत असेच आहे. गुणा गुणज्ञेषु गुणा: भवन्ति …. ही उक्ती सार्थ ठरवणारे. आजच्या या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे हे नक्की.

 

प्रथेप्रमाणे या घवघवीत उत्तुंग यश विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात पेढे वाटून करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर आणि शाखेचे प्राचार्य डॉ. अभिजित टकले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा उचित सत्कार केला, आणि त्यांना त्यांच्या भावी उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. online निकाल लागल्यावर लगेचच आयोजित करण्यात आलेला आजचा हा सत्कार समारंभ छोटेखानी असला तरी त्याची उंची वेगळीच होती हे नक्की.