September 8, 2024

Samrajya Ladha

सहकारी संस्था आणि बॅंकांनी शेतकर्‍यांना शेती उत्पन्नवाढीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे : हणमंतराव गायकवाड

योगीराज पतसंस्थेच्या 28 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा..

बाणेर :

शेतकर्‍यांना शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी सहकारी संस्थांनी व बॅंकांनी मार्गदर्शन तसेच आर्थिक सहाय्य दिले पाहिजे असे प्रतिपादन बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी योगीराज पतसंस्थेच्या 28 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले.

 

याप्रसंगी सृष्टी जोशी या विद्यार्थिनीला ऑस्ट्रेलिया ला जाण्यासाठी 10 हजार रुपयांची मदत केली. तसेच पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या उपाध्यक्ष पदी नेमणूक झाल्याबद्दल दत्तात्रय बालवडकर, रशिया येथे रौप्य पदक मिळविणाऱ्या शिवराज बालवडकर यांचा 5 हजार, कृष्णा शिंदे व अनुश्री मैंद यांना बारावी मध्ये अनुक्रमे 97% व 95% गुण मिळाल्याबद्दल प्रत्येकी 5 हजार रुपये देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेतील कर्मचार्‍यांना प्रत्येकी 20 हजार रुपये असे एकूण 4 लाख 80 हजार रुपयांच मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक अनुदान याप्रसंगी देण्यात आले.

योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, संस्थेच्या दोन शाखा असून ठेवी 126 कोटी, कर्ज 100 कोटी, व्यवसाय 226 कोटीच्या पुढे झाला आहे तर निव्वळ नफा 3 कोटी 31 लाख रुपये झाला आहे. आर्थिक प्रगती बरोबरच संस्था सामाजिक बांधिलकी च्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असते. तसेच वर्धापन दिनानिमित्त संस्थेत आज 1 कोटी रुपयांची ठेव जमाझालीआहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे यांनी याप्रसंगी सांगितले की, योगीराज पतसंस्था ही बॅंकेच्याही पुढे जाऊन काम करत आहे. आर्थिक प्रगती बरोबरच सामाजिक बांधिलकी भावना जपत उल्लेखनीय कामगिरी करत आहे याची इतर संस्थानी दखल घेण्याची गरज आहे.

याप्रसंगी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेवक सनी निम्हण, शिवाजी बांगर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी पंचायत समिती सदस्य अशोक मुरकुटे, प्रभाकरअण्णा मोहोळ, बीव्हीजी ग्रुपच्या वैशाली गायकवाड, लक्ष्मीकृपा बँकेचे अध्यक्ष दादा गायकवाड, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन विधाते, बांधकाम व्यावसायिक खर्डे पाटील, हॉटेल व्यावसायिक रामदास मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल बालवडकर, माजी सरपंच नारायण चांदेरे, गणपत बालवडकर, नामदेव गोलांडे, गुडवील इंडियाचे कालिदास मोरे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त दिलीप फलटणकर, प्रविण शिंदे, संग्राम मुरकुटे, रोहित कासट, श्रीकांत जाधव, दत्तात्रय तापकीर, गोसेवक संजय बालवडकर, सुधाकर धनकुडे, श्रीकांत पाटील, श्रीकांत जाधव, विविध बँकांचे प्रतिनिधी, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, संचालक संजय बालवडकर, गणेश तापकीर, संचालिका अलका सिरसगे, रंजना कोलते, वैशाली विधाते, माजी संचालक अशोक रानवडे, वसंत माळी, अमर लोंढे, सर्व स्टाफ तसेच खातेदार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तज्ञ संचालक रविंद्र घाटे यांनी केले तर सर्वांचे आभार शाखाध्यक्ष आप्पाजी सायकर यांनी मानले.