September 8, 2024

Samrajya Ladha

दहावीतही पेरीविंकलच्या बावधन शाखेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम..

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बावधन येथे दहावीच्या परीक्षेतही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून यावर्षीही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. बावधन शाखेच्या नील अर्जुने याने 92. 60% मिळवून प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पटकावला तर सेजल सुपेकर हिने 91 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला श्रावणी दरोडे हिने 90.40% मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

 

याउत्तुंग यशाचे शिलेदार पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संस्थापक श्री राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कोल्हे, वर्गशिक्षिका विद्या झोपे तसेच राजश्री थोरात या सर्वांनी या निकालासाठी अथक परिश्रम घेतले.

शाळेच्या निकालाची शंभर टक्के परंपरा यावर्षीही कायम राखत 36 विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाले व उर्वरित सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.

निकालाच्या या यशाचे श्रेय हे पेरिविंकल स्कूलच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्ग या सर्वांना जाते असे प्रतिपादन पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संस्थापक श्री राजेंद्र बांदल यांनी यावेळी केले.

विशेष प्राविण्य : नील अर्जुने याने विज्ञानामध्ये विज्ञान या विषयात 96 तर सेजल सुपेकर व शिवराज दगडे यांनी गणित या विषयांमध्ये 94 गुण मिळवले, चैतन्य चव्हाण याने सामाजिक शास्त्रामध्ये 93 गुण मिळवले, श्रावणी दगडे हिने हिंदी मध्ये 95 मार्क मिळवले आहेत