May 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

चिखलवाडी येथे बुद्ध जयंती निमित्त विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार वितरण..

पुणे :

डॉ.बाबासाहेबा आंबेडकरांच्या जयंती निमित्त चिखलवाडी येथील भीमज्योती तरुण मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, यातील विजेत्या स्पर्धकांना आज बुद्ध जयंती निमित्त पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

 

यावेळी ज्येष्ठ पत्रकार, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने, अ‍ॅड. आम्रपाली धिवार, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त अतिरिक्त सचिव सिद्धार्थ गार्टे, निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जगताप, सुनील रणपिसे, फ्रांसिस डिसोजा, दिनेश चंदनशिवे, जगदीश मोहिते, रवी काळे, गौतम भंडारे, किशोर भंडारे, मीना जाधव, रेखा काळे तसेच संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा संघमित्रा वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमज्योती तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील भालेराव होते. तर सूत्रसंचालन मंडळाचे सचिव बी.एल.येडे यांनी केले.