July 27, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथील श्री म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालयानेबारावी निकालात उत्तुंग निकालाची राखली परंपरा… तर सीबीएससी परीक्षेत सी एम इंटरनॅशनल स्कुलचा सलग चवथ्या वर्षी शंभर टक्के निकाल…

बालेवाडी :

श्री खंडेराय प्रतिष्ठानचे श्री म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा फेब्रुवारी /मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेचा निकाल शाखा निहाय पुढील प्रमाणे
विज्ञान शाखा =100%
वाणिज्य शाखा =100%
कला शाखा =84.74%
इतका लागला असून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक कुमारी ऋतुजा गायकवाड हिला शेकडा गुण ८८.१७ तसेच वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक कु. शिंदे कोमल हिला शेकडा गुण ८८.१७ तर कला शाखेमध्ये कुमारी टोणपे पूजा हिला शेकडा गुण 73.50 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ,अध्यापक ,प्राचार्य, इतर कर्मचारी तसेच संस्थेचे सचिव डॉक्टर सागर दादा बालवडकर आणि संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव तथा आप्पासाहेब बालवडकर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले तसेच संस्थेच्या वतीने सर्वांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या सी बी ए सी 12 वी च्या निकालानुसार श्री खंडेराय प्रतिष्ठान, बालेवाडीच्या सी एम इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थ्यांनी सलग चवथ्या वर्षी शंभर टक्के निकाल नोंदवीला असून शाळेतील लावंण्या कुलकर्णी हिला 81.50% तर दिव्या गोरला हिला 80.50% आणि विशाल मोरे ह्याला 78.83% टक्के गुण प्राप्त झाले.

सदर विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध खेळ, कला प्रकार आणि अभ्यासाचे वेळापत्रक यांची सांगड घालून देण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षकांनी आणि प्राचार्या इक्बाल कौर राणा यांनी मार्गदर्शन केले.

ह्या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर आणि संस्थेचे सचिव डॉ सागर बालवडकर यांनी विदयार्थ्यांचे आणि सर्व शिक्षक वृंदाचे कौतुक केले.
उत्तम शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य मार्गाने आयुष्य जगण्यास मदत करते आणि अभ्यासाबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी इतर स्पर्धा परीक्षा आणि शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढविण्याकरिता खेळ आणि विविध कला प्रकाराकडे तेवढेच लक्ष दिले पाहिजे असे सचिव डॉ सागर यांनी नमूद केले.

 

You may have missed