May 24, 2024

Samrajya Ladha

बाणेर- बालेवाडी रिक्षा संघटनेचा स्तुत्य उपक्रम, मतदानासाठी जाण्याकरिता मोफत रिक्षा सेवा उपलब्ध..

बाणेर :

आपल्या देश हितासाठी प्रत्येकाने मतदान करावे म्हणून मतदान केंद्रावर जाण्याकरता येणाऱ्या अडचणी लक्षात घेत बालेवाडी बाणेर रिक्षा संघटनेच्या वतीने बाणेर बालेवाडी परिसरातील गरज असणाऱ्या मतदात्याना मोफत रिक्षा सेवा उपलब्ध करून दिली आहे.

एक स्तुत्य उपक्रम राबवत बालेवाडी बाणेर परिसरातील रिक्षावाले काकांनी उत्तम आदर्श निर्माण करत मतदान करताना महिला व ज्येष्ठ नागरिकांची अडचण होऊ नये त्यांना मतदान करता यावे म्हणून मोफत रिक्षा सेवा उद्या मतदान करण्यासाठी उपलब्ध करून देत देशहिताचे काम करत आहेत.

रिक्षा संघटनेच्या वतीने बालेवाडी येथील दिलीप बालवडकर(अध्यक्ष स्वाभिमानी प्रवासी वाहतूक संघटना) यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही रिक्षा संघटनेचे पदाधिकारी बाणेर बालेवाडी परिसरातील नागरिकांना आव्हान करत आहोत की, आपण आपले मतदान देशहितासाठी करणे आवश्यक आहे. मतदानाचे महत्व लक्षात घेऊन आपणास मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाण्याकरिता आम्ही मोफत रिक्षा सेवा उपलब्ध करून देत आहोत. तरी महिला भगिनी व ज्येष्ट नागरिकांसाठी बाणेर बालेवाडी परिसरातील रिक्षावाले काकांचे नंबर देत असून आपण त्यांना कॉल करून या सुविधेचा लाभ घेत मतदान करावे हि विनंती.