May 15, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे श्री भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात पैलवान शिवराज राक्षेने जिंकली मानाची कुस्ती..

बाणेर :

बाणेर येथील श्री भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न झाल्या. या स्पर्धेत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी अंतिम कुस्तीमध्ये छोटा जसा या पैलवानाला चितपट करून मानाची कुस्ती जिंकली.

 

बाणेर येथे अक्षय तृतीयेच्या निमित्त होणारा श्री भैरवनाथ देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उत्सवाच्या निमित्ताने भैरवनाथ देवाची पालखी मिरवणूक ढोल, लेझीम पथक आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये वारकऱ्यांच्या समवेत काढण्यात आली. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. उत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते.

आखाड्यातील कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्रतील नामवंत पैलवान सहभागी झाले होते. यामध्ये शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक शेख, माऊली जमदाडे, माऊली कोकाटे, पृथ्वीराज मोहोळ, तसेच पंजाब केसरी धरमे्द्र कोहली या सारख्या नामवंत पैलवानांच्या कुस्त्या या ठिकाणी पार पडल्या. तसेच अनेक राष्ट्रीय खेळाडुंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता.

यावेळी विशेष आकर्षण म्हणून महिलांच्या कुस्ती देखील पार पडल्या. कुस्त्यांच्या आखाड्याचे नियोजन श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर आणि ग्रामस्थ यांच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांनी एकत्रित रित्या उत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पाडला.