May 24, 2024

Samrajya Ladha

नवचैतन्य हास्ययोग परिवार बालेवाडी शाखेचे १००% मतदान..

बालेवाडी :

नवचैतन्य हास्ययोग परिवार, बालेवाडी शाखेतील सदस्यांनी लोकसभेसाठी जास्तीतजास्त मतदान करावे असे अपील बालेवाडी शाखेचे अध्यक्ष श्री.गणपतराव बालवडकर यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देतांना सर्वच्या सर्व सदस्यांनी मतदान केल्याचे निदर्शनास आले.

सी.एम.इंटरनॅशनल स्कूल मधील मतदान केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना सहज सुलभ मतदान करता यावे म्हणून एसकेपी कँपसमध्ये वेगळा कक्ष उभा केला होता. येथून मतदाना साठी आलेले ज्येष्ठ नागरिक, अपंग, आजारी व्यक्ती यांना मतदानासाठी मार्गदर्शन करतानाच त्यांना योग्यरीत्या मतदान कक्षा पर्यंत पोहोचविणे, मतदार यादीत नांव तपासणे, मतदानाच्या रांगेत उभे न करता मतदानासाठी प्राथमिकता देऊन सहकार्य करणे, इत्यादी कामे करण्यात आली.

या कामी ॲड.एस.ओ.माशाळकर यांनी पुढाकार घेतला.
या सहाय्यता कक्षात शाखा प्रमुख श्री.पद्माकर राऊत, ऊपशाखा प्रमुख श्री.सुरेश कुंभारे, श्री.गणेश अलोने, प्रदीप देशपांडे, डाॕ. सुधीर निखारे, महिला प्रतिनिधी अनुराधा कुलकर्णी, किरण कुमार हे सहभागी होते.