May 24, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महायुतीचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ पद यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

बालेवाडी :

पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ बालेवाडी गावठाण परिसरात पुणे मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय बाबुराव आप्पा चांदेरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर, सौ. ज्योती राहुल बालवडकर , सौ.पुनम ताई विधाते यांच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली.

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ बाणेर बालेवाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमचे मार्गदर्शक बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पदयात्रा काढत मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करून पत्रके वाटण्यात आली. यावेळी नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त सहभाग आणि प्रतिसाद पाहता महायुतीला भरघोस मतदान मिळेल अशी खात्री आहे : राहुल बालवडकर (पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष)

या वेळी बालेवाडी गावातील महिला, जेष्ठ नागरिक तसेच मनोज बालवडकर पाटील,शिवम बालवडकर,चेतन बालवडकर, अंकुशराव बालवडकर, अविनाश बालवडकर, बाळासाहेब बालवडकर, दिनकर आप्पा बालवडकर, जालिंदर बालवडकर, महेश बालवडकर, किरण धेंडे, महेश भांडे, अक्षय कांबळे, राजेश चव्हाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला पदाधिकारी राखी श्रीराव, सुषमा ताम्हाणे, वैशाली हर्षल तापकीर, प्राजक्ता ताम्हाणे, अक्षदा विधाते, स्वाती बालवडकर, कोमल तांबे, ऐश्वर्या शिंदे, शामल जाधव उपस्थित होते. पदयात्रे वेळी नागरिकांना प्रचार पत्रक वाटण्यात आले.