बाणेर :
बाणेर येथे श्री भैरवनाथ उत्सव मोठया उत्साहात साजरा होणार असुन, त्यानिमित्त दिनांक १० मे ते ११ मे रोजी विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि क्रीडात्मक कार्यक्रम भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि बाणेर गाव ग्रामस्थ यांच्या वतीने घेण्यात येणार आहे.
याबद्दल माहिती देताना बाणेर गाव देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळाने सांगीतले की, गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून यावर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, व कुस्त्यांचा जंगी आखाड्याचे आयोजन केले आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी, भाविकांनी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करत आपल्या गावच्या भैरवनाथ महाराज उत्सवात सहभागी व्हावे.
आज पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून सायंकाळी भव्य ढोल, ताशा, लेझिम, टाळ, मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
आज सायंकाळी माधुरी पवार यांचा सांस्कृतिक कार्यक्रम ‘बेधुंद अप्सरा’ चे आयोजन केले आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच भव्य निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा उद्या शनिवारी ११/५/२०२४ रोजी दुपारी तीन ते आठ दरम्यान होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम सावरकर क्रीडा उद्यान, ताम्हाणे चौक, पारखे-शिंदे मळा बाणेर येथे होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी ग्राम दैवत उत्सवात सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
More Stories
औंध येथे सचिन मानवतकर मित्र परिवार तर्फे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन – हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सुस येथील फ्रेशिआ सोसायटी समोरील रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामाचा शुभारंभ – चांदेरे परिवारामुळे नागरिकांना दिलासा..
बाणेर येथे सौ. पूनम विशाल विधाते यांच्या पुढाकाराने ‘वामा वुमन्स क्लबचा’ हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न..