बालेवाडी :
काल गुरुवार दि. 9 मे रोजी सायं 5 वाजता भारती विद्यापीठ समोर, ममता चौक, बालेवाडी हायस्ट्रीट, बालेवाडी येथे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
अमोल बालवडकर यांच्या वतीने होत असलेल्या विकासकामांचे कौतुक वाटते. जनतेसाठी सुरू केलेल्या या कार्यालयाच्या माध्यमातून समस्त नागरिकांचे प्रश्न निश्चितपणे सुटतील ही सदिच्छा व्यक्त करतो. विविध मान्यवरांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार : देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)
याप्रसंगी माजी मंत्री श्री. हर्षवर्धनजी पाटील, माजी भाजपा शहराध्यक्ष श्री. जगदीशजी मुळीक, भाजपा पुणे शहराध्यक्ष श्री. धीरजजी घाटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस श्री. पुनीतजी जोशी, भाजपा पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी, युवावर्ग, मित्रपरिवार, परिसरातील विविध सोसायटींमधील नागरिक तसेच बाणेर- बालेवाडी- सुस- म्हाळुंगे- पाषाण- सोमेश्वरवाडी- औंध मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी