बाणेर :
बाणेर येथे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमूख उपस्थित संपन्न झाली. युवकाच्या संकल्पपत्राचे या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या संकल्पनेतून हे संकल्पपत्र तयार करण्यात आले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापन एसटीपीसाठी पुण्याला निधी दिला. पिण्याच्या पाण्यासाठी मोदींनी निधी दिला. पुण्यात मेट्रो धावतेय. त्याचे नेटवर्क तयार होतय. प्रदूषण टाळले जातय, मेट्रोसह इलेक्टिक बस आल्या. सर्वाधिक इलक्ट्रिक बसेस पुण्यात आहेत. स्मार्ट सिटीचे व्हिजन आहे. मोदीजींच्या निधीतून कामे केली. प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीबांना पक्की घरे दिली. त्यामुळे सुनियोजित शहर तयार होईल.
2014 पासून बदललेले पुणे आपल्याला बघायला मिळाले. अजित पवार आमच्या सोबत आहे म्हणून कामाचा वेग वाढला आहे. एअरपोर्ट, रिंगरोड यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. मॅन्युफॅकचरिंग आयटी हब आहे. देशातील सर्वोत्तम शहर बनण्याची ताकद पुण्यात आहे. आपण केवळ एक खासदार निवडुन देत नाही तर पुण्या करता काम करणाऱ्या मोदींसाठी खासदार निवडून देत आहोत. त्यांच्या माध्यमातून काम करायचे आहे. बापट साहेबांनी चांगले काम केले. त्यांचे काम पुढे न्यायचे आहे.
मोदीजींनी काय जादू केली 25 कोटी लोक गरीबी रेषेखाली आले. 20 कोटी लोकांना घरे, 50 कोटी लोकाना शौचालये, 60 कोटी लोकांना नळाद्वारे पाणी, 80 कोटी लोकांना रेशन, पुढील पाच वर्षे रेशन देणार, 55 कोटी लोकांना आयुष्मान भारत योजना, 63 कोटी लोकांना मुद्रा कर्ज, त्यात 50 टक्क्यांहून जास्त मुली आणि महिला आहेत, 20 लाखापर्यंतचे लोन आता देणार, 80 लाख बचतगटांना निधी दिला, 10 कोटी लखपती दिदी होतील, बारा बलुतेदारांना विश्वकर्मा योजना आणली, आधुनिक प्रशिक्षण दिले, ज्येष्ठ नागरिकांना सर्व उपचार मोफत केले, वयोश्री योजना आणली, दिव्यांगासाठी कृत्रिम पाय आणि हाताच्या फॅक्टरी भारतात उघडल्या, मोदीजींनी पहिल्यांदा शहराची काळजी केली, असे यावेळी फडणवीस यांनी बोलताना सांगितले.
पुढे फडणवीस म्हणाले की, लोकशाहीत मतदानाचा पवित्र अधिकार आहे. जो मतदान करतो त्याला नैतिक अधिकार आहे. मतदान ही देशसेवा आहे. तुमच्या मतदानातून कर्तबगार सरकार तयार होते. कमळाचे बटन दाबा, मुरलीधर मोहोळ यांना मत मिळेल. तुमचे आशीर्वाद मोदींना मिळतील मोदीजी मजबूत भारत बनवतील.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ॲमेनिटी स्पेसवर विविध सुविधा झाल्या. अतिशय वेगाने मेट्रोची वाढ होते आहे. चांदणी चौकाचे काम पूर्ण होऊ शकले. पायाभूत सुविधांसाठी निधी दिलेला आहे. पाणीपुरवठ्याची अपुरी सोय आहे. रोज टँकरने पाणी मागवावे लागते. सूस रस्त्यावरील कचरा प्रकल्प गंभीर आहे. प्रशासनावर अंकुश ठेवण्याची गरज आहे. आजपर्यंत भाजपच्या माध्यमातून या भागाचा विकास झाला. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना मतदानाच्या रुपाने आशिर्वाद मिळेल असा विश्वास वाटतो.
चंद्रकांत पाटील म्हणाले, गिरीश बापट यांना 3 लाख 23 हजार मतांचे मताधिक्य होते. ते वाढविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार यांनी अधिकाधिक मतदान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी देशाच्या निवडणुकीत मतदान घडवावे लागेल. मोदीजींनी समाजाच्या विविध घटकांसाठी काम केले. 2014 ला 18 कोटी मतदान झाले तर 2019 ला 23 कोटी मतदान झाले. या वेळेला 30 कोटी मतदान होईल असे राजकीय जाणकार सांगतात. कारण आपल्याला मोदीजींनी जे आश्वासन दिले ते पूर्ण केले. प्रत्येक योजनेत 141 कोटी लोकांना सहभागी करून घेतले. दारिद्य्र रेषेखालील 25 टक्के लोकांना बाहेर आणले. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम केले आहे. विक्रमी मताधिक्याने मुरलीधर मोहोळ यांना विजयी करावे.
यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहर अध्यक्ष धीरज घाटे, हर्षवर्धन पाटील, जगदीश मुळीक, मकरंद देशपांडे, अमोल बालवडकर, दत्ता गायकवाड, गणेश बिडकर, बाबुराव चांदेरे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, परशुराम वाडेकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अर्चना मुसळे, लहु बालवडकर, सचिन पाषाणकर, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, रोहन कोकाटे, मोरेश्वर बालवडकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
More Stories
शिवम बालवडकर यांचे वडील मारुती किसन बालवडकर यांचे अल्पशा आजराने निधन, दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 06/12/2024 रोजी..
बाणेर येथे पुणे जिल्हा कुमार व कुमारी गट निवड चाचणी स्पर्धेत कुमार गटात प्रकाश तात्या बालवडकर क्लबने तर कुमारी गटामध्ये डॉ. पतंगराव कदम कबड्डी संघाने मिळविले विजेतेपद…
बाणेर येथील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूटतर्फे ७ व ८ डिसेंबरला ‘रिकन्स्ट्रक्टीव्ह युरोलॉजी’वर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा