April 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

मुरलीधर मोहोळ यांची सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पाषाण, बाणेर, बालेवाडी परिसरात जोरदार प्रचार फेरी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

पाषाण :

सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पाषाण, बाणेर, बालेवाडी परिसरात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भव्य टू व्हीलर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि या रॅलीमध्ये महा युतीचे सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सहभागी झाले होते. रॅली चे स्वरूप अतिशय भव्य दिव्य होते. ठीक ठिकाणी पुष्प वृष्टी करत स्वागत करण्यात आले.

 

या रॅली दरम्यान मुरलीधर मोहोळ यांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पाषाण, बाणेर, बालेवाडी परीसरात मोहोळ यांनी महापौर असताना केलेल्या कामामुळे ते लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचार फेरीला खूप मोठा प्रतिसाद लाभला.

या प्रचार फेरीत युवकापासून थोरामोठ्यांनी देखील सहभाग घेतला. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करत मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या.

या प्रचार फेरीत भाजपा माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठया उत्साहात सहभागी झाले होते.

You may have missed