May 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

वसुंधरा रक्तदान शिबिरात नववधुने लग्नाच्या दिवशी केले रक्तदान, २०७ रक्त दात्यांनी केले रक्तदान…

बाणेर :

बाणेर येथे वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. गेले बारा वर्ष अविरत पणे रक्तदान शिबिर आयोजित केले गेले. यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे अभियानाच्या २०७ सदस्यांनी मोठ्या उत्साहात रक्तदान करत आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली. वृक्षारोपण बरोबर रक्तदानाचे महत्वपूर्ण योगदान वसुंधरा अभियान मार्फत दिले जाते.

 

गरजु रुग्णांची रक्ताची गरज भागवण्यासाठी अत्यावश्यक असे रक्त ,की जे आपल्याला कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही, रक्तदानातूनच गरजु रुग्णांचा जीव वाचविता येतो. म्हणून रक्तदान शिबिर कार्य, गेले बारा वर्षापासून वसुंधरा अभियान मार्फत चालू आहे. आज प्रयत्नपूर्वक केलेल्या, सुयोग्य नियोजन माध्यमातून 207 रक्त पिशव्या संकलन करण्यात आले, म्हणजेच जवळपास हजारो रुग्णांना रक्त व रक्त घटकांचा प्रत्यक्षात उपयोग त्याचा होणार आहे.

वसुंधरा कन्या व नववधू मानसी मोहन हिंगडे हिच्या हस्ते शिबिराचे उद्धाटन करण्यात आले. नववधू मानसी आणि तिचे वडील मोहन हिंगडे या दोघांनीही रक्तदान केले. नववधू कडून स्वतः च्या लग्नदिवशी रक्तदान करून समाजापुढे रक्तदानाचे महत्व पटवून देऊन आदर्श निर्माण करण्याचं काम या कन्येने केलं आहे.