May 16, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आमदार अभिजीत वंजारी यांनी घेतली दिलीप मुरकुटे यांची भेट..

बाणेर :

आज बाणेर येथे पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आमदार मा. श्री अभिजीत वंजारी यांनी मा.श्री. डॉ.दिलीप मुरकुटे पाटील यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट घेत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला.

 

यावेळी आमदार वंजारी यांनी दिलीप मुरकुटे यांच्याकडून कोथरूड मतदार संघाची राजकीय लोकसभेची पुणे शहरची माहिती घेतली. दिलीपभाऊ मुरकुटे यांच्या वतीने आमदार अभिजित वंजारी यांचा सत्कार करण्यात आला.

त्यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक शिवाजी बांगर, बाणेर गावचे माजी उपसरपंच देविदास मुरकुटे पाटील, कोथरूड मतदारसंघाचे ब्लॉकचे अध्यक्ष दत्ता जाधव, अथर्व सोसायटीचे सचिव सुनील जाधव, अथर्व सोसायटीचे खजिनदार संजय बोरावके ,किरण मुरकुटे, संतोष भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.