December 5, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा घरोघरी भेट देऊन मुरलीधर मोहोळ यांचा जोरदार प्रचार..

बाणेर :

पुणे लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्री. मुरलीधरअण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ बाणेर परिसरात रविवारी भाजपा उत्तर मंडल भागातील माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घरोघरी भेट देऊन नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी नागरीकांना पत्रक तसेच मतदान स्लीप वाटप करण्यात आले.

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने नागरिकांची घरोघरी भेट देऊन प्रचार करत बाणेर परीसर पिंजून काढण्यात आला. यावेळी सर्व नगरसेवक महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

यावेळी सर्व नगरसेवक महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत घरोघरी भेट देऊन प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी तसेच महायुतीचे उमेदवार श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या कामांची माहिती दिली. नागरिकांचा प्रतिसाद व उत्साह पाहता बाणेर परिसरातून महायुतीला प्रचंड मताधिक्य मिळेल हा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.

You may have missed