September 17, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी एसकेपी कँपस मध्ये नवचैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आला ज्येष्ठांचा सत्कार..

बालेवाडी :

नवचैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शुक्रवार डीआयएमआर हाॕल, एसकेपी कँपस, बालेवाडी येथे आयोजित सभे मध्ये ८० वर्षा वरील सभासदांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. गणपतराव बालवडकर आणि प्रमुख पाहुणे श्री. नरसिंह देशपांडे होते.

यावेळी बोलताना डाॕ.प्रफुल्ल चौधरी यांनी सांगितले की मनावर संयम आणि मित आहार यागोष्टी दिर्घायुषी ठरायला मदत करतात.

प्रमुख पाहुणे श्री नरशिंह देशपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, मी वयाच्या ९५ व्या वर्षी सुद्धा सकाळी लवकर उठतो, नियमित व्यायाम करतो, सोसायटीच्या आवारात सकाळी संध्याकाळी फिरतो, वाचन करतो, कशाचीही चिंता करीत नाही त्यामुळे माझी तब्येत चांगली रहाते.

अध्यक्ष स्थानावरुन बोलताना श्री. गणपतराव बालवडकर म्हणाले की, आमच्या एसकेपी कँपसमध्ये सकाळी हास्यक्लब चालतो. बालेवाडी परिसरातील ७० – ७५ ज्येष्ठ नागरिक रोज सकाळी लवकर उठून व्यायाम, हास्ययोग आणि प्राणायाम करतात त्यामुळे त्यांची तब्येत चांगली राहते.

या कार्यक्रमात ८० पेक्षा जास्त वय असलेल्या २२ जेष्ठ सभासदांचा शाॕल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. तसेत या कार्यक्रमात वरील वक्त्या व्यतिरिक्त श्री. रंगराव पवार, बालसुभाष कोत्तावार, शिवप्पा गाणिगेर यांनी आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व नियोजन ॲड.एस.ओ. माशाळकर, यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.पद्माकर राऊत, सुरेश कुंभारे, गणेश अलोने, दिलीप फलटणाकर, प्रदीप देशपांडे, दिलीप व्यास, अभिनय मुलमुले, दिपक पावसे, श्रीकृष्ण काळे, महिला प्रतिनिधी अनुराधा कुलकर्णी, जयश्री देशपांडे, शालन पाटील, किरण कुमार, प्रतिभा अलोने, माधुरी इंगाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.