पाषाण :
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ भागातील बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी या भागातील सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी मिळुन बालेवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोथरुड पर्यंत भव्य बाईक रॅली काढली.
या बाईक रॅली मध्ये बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते देखिल सामील झाले होते. सहभागी असणाऱ्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.




More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी