बोपोडी :
बोपोडी गावठाण आणि परिसरातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ परिसरातील कार्यकर्ते, मंडळे आणि मतदारांच्या उत्साहात आमदार श्री. सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या समवेत लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची पदयात्रा काढण्यात आली. घोषणा आणि जल्लोषी स्वागतात कार्यकर्त्यांनी परिसर जणू दणाणून सोडला होता.
बोपोडीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ चरणी माथा टेकवत पदयात्रेला प्रारंभ केला. बोपोडी गावठाण, छत्रपती शिवाजी महाराज मंडळ, भीमज्योत नगर, सर्व्हे नं. २४, २५, २६, चांदणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नाईक चाळ, मस्जिद मोहल्ला, बोपोडी रेल्वे गेट, सर्व्हे नं. ५३, ५४, गोपी चाळ, गेट नं. २०, भोईटे चाळ या परिसरात निघालेल्या पदयात्रेत मोहोळ यांनी अनेक माय-माऊलींना नमस्कार करत, अनेकांशी संवाद साधला. तरुण कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन केले, तर ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. एकूण वातावरण उत्साह वाढविणारे होते. याप्रसंगी गोर-गरिबांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचं मोहोळ यांनी आवाहन केलं. त्याला सर्वांनी जोरदार घोषणा देत समर्थन दिलं.
या पदयात्रेत माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, आनंद छाजेड, माजी नगरसेवक सनी निम्हण, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, मुकेश गवळी, कार्तिकी हिवरकर, विजय जाधव, करीम शेख, सुप्रीम चोंधे, अमित जविर, अविनाश कदम, अप्पा वाडेकर, विजय ढोणे, गणेश स्वामी, सचिन अंकेलू, समीर नाईक, सचिन नाईक, अंकित नाईक, सपना छाजेड, नेहा गोरे, रेखा चोंधे, मनीषा कांबळे, शाम काची, मयुरेश गायकवाड, संकेत कांबळे, मयूर बोलाडे, वैभव प्रभाकर, बाळू सोरटे, हेमंत दीक्षित, शुभम आयने, चेतन जाधव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.
More Stories
महाळुंगे आणि सुस परिसरातील नागरिकांच्या समस्यां सोडविण्यावर भर देणार आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचे ‘जनता दरबार’, मध्ये नागरिकांना आश्वासन…
औंधगाव ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज उत्सव २०२५ आनंदात साजरा
“बाणेरवासीयांच्या आरोग्यासाठी सौ. पूनम विधाते यांचा पुढाकार, अजितदादांकडे गार्बेज प्लांट हटवण्याची मागणी”