बालेवाडी :
श्री खंडेराय प्रतिष्ठान आणि बालेवाडी वुमन्स क्लब च्या संयुक्त विद्यमानाने आयोजित बालेवाडी वुमन्स क्रिकेट टूर्नामेंट, एस के पी रोलिंग ट्रॉफी चा उदघाटन सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला.
श्री खंडेराय प्रतिष्ठान च्या सी एम इंटरनॅशनल स्कूल ची राज्य पातळीवरील सायकलिंग चॅम्पियन कुमारी आभा सोमण हिच्या हस्ते मशाल पेटविण्यात आली. त्याच बरोबर जिमनास्टिक च्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण करण्यात आले.
सदर स्पर्धे साठी बालेवाडी मधील विविध सोसायटी मधील महिला खेळाडूंनी भाग घेतला असून 27 एप्रिल सायंकाळी 7 वाजता अखेरचा सामना रंगणार आहे.
आजकालच्या धकाधाकीच्या जीवनात आपण खेळणे विसरलो आहे. जीवनात नाना प्रकारचे ताण तणाव निर्माण होत असून अनेक मानसिक व्याधीनी लोक ग्रासले जात आहेत म्हणूनच ‘बेलन से ले कर बॅट तक’ हा उपक्रम दर वर्षी आयोजित केला जातो : डॉ सागर बालवडकर (सचिव श्री खंडेराय प्रतिष्ठान संस्थेचे)
श्री खंडेराय प्रतिष्ठान तर्फे विविध 17 क्रीडा प्रकार आणि 6 कला प्रकारचे शास्त्रीय दृष्टीकॊनातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते, विविध स्पर्धासाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाते अशी माहिती डॉ सागर यांनी दिली.
स्पोर्ट फिसिओ, स्पोर्ट नुट्रीशनिस्ट त्याच बरोबर योगा आणि मेडिटेशन हा एस के पी स्पोर्ट प्रोग्राम चा महत्वाचा भाग आहे अशी माहिती श्री मनोज चव्हाण यांनी दिली.
महिलांना विविध सामाजिक पातळीवर काम करता यावे त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा या हेतूने स्थापित झालेल्या बालेवाडी वुमन्स क्लब च्या संस्थापिका अध्यक्षा सौ रुपाली बालवडकर यांनी सर्व स्पर्धेकांना शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर, चैतन्य हास्य क्लब चे आडवोकेट माशाळकर, श्री देशपांडे, श्री कोठवळे, श्री इंगळे त्याच बरोबर फर्दीन खान आणि कुलदीप वीज उपस्थित होते.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..