May 21, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांची भाजपा लोकसभा निवडणूक नियोजन समिती अंतर्गत कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी निवड..

बालेवाडी :

मा. नगरसेवक श्री अमोल बालवडकर यांची भाजपा लोकसभा निवडणूक नियोजन समिती अंतर्गत कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी निवड करण्यात आली. भाजपा लोकसभा चुनाव प्रबंधन समिती पुणे लोकसभा मतदार संघातील कोथरूड विधानसभा निवडणुक नियोजन समिती जाहिर करण्यात आली. भाजपा पुणे लोकसभा उमेदवार यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी लोकसभा मतदारसंघांत येणाऱ्या कोथरूड विधानसभा मतदार संघाची समिती गठित करण्यात आली.

 

या समिती मध्ये बाणेर बालेवाडी पाषाण भागातून भाजपा पुणे शहर चिटणीस लहू बालवडकर, प्रकाश बालवडकर, सचिन दळवी, रोहन कोकाटे, सुभाष भोळ, यश ताम्हाणे, उमा गाडगीळ, निलेश सायकर, वंदना सिंग, उत्तम जाधव, अस्मिता करंदीकर, नितीन रनवरे, सचिन सुतार, विवेक मेथा, आदी भाजपा पदाधिकाऱ्यांचा देखिल नियोजन समिती मध्ये समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्या पुणे लोकसभा मतदार संघातून लोकप्रिय उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्वांसोबत प्रयत्न करणार आहे : माजी नगरसेवक अमोल बालवडकर

लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अमोल बालवडकर यांनी मोदींना परत पंतप्रधान करण्यासाठी अब की बार चारशे नारा लावत रोज चारशे घरांशी संपर्क अभियान राबवत मतदारांशी संपर्क साधत आहेत.