May 21, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त दर्शन आणि प्रसाद कार्यक्रम कल्याणी टोकेकर यांच्याकडे मान्यवर, स्नेहिजन, मित्रपरिवार यांची उपस्थिती..

बालेवाडी :

चैत्र शुद्ध द्वितीया, १० एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भाजप उत्तर कोथरूड मंडल उपाध्यक्ष सौ कल्याणी टोकेकर यांचेकडे दर्शन आणि प्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास अनेक मान्यवर, स्नेहिजन, मित्रपरिवार आप्तेष्ट आले होते.

 

दर्शनासाठी आलेल्या राज्यसभा खासदार सौ मेधाताई कुलकर्णी, पुणे लोकसभा भाजप महायुती उमेदवार श्री मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी मा. नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहोळ यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत, भाजप पुणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष सौ हर्षदा ताई फरांदे तसेच बाणेर पाषाण बालेवाडी भागातील भाजप माजी नगरसेवक श्री अमोल बालवडकर, माजी नगरसेविका सौ ज्योती गणेश कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर, भाजप पुणे शहर उपाध्यक्ष गणेश ज्ञानोबा कळमकर, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महामंत्री प्रल्हाद सायकर, भाजप पुणे शहर चिटणीस लहू अण्णा बालवडकर, भाजप पुणे शहर चिटणीस राहुल कोकाटे, बाणेर भागातील ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाणेर भागातील नेते किरण चांदेरे, सौ. सरला बाबुराव चांदेरे, सौ. पूनम विशाल विधाते दर्शनास आले होते.