बालेवाडी :
बालेवाडी येथील ह.भ.प ज्योतीभाऊ विश्वनाथ थोरवे यांचे ०९/०४/२०२४ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे दोन मुले, २ मुली व नातवंडे असा परिवार आहे. ॲड. पांडुरंग ज्योतीभाऊ थोरवे विश्वस्त- श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी, मा. अध्यक्ष पुणे बार असोसिएशन व श्री. ज्ञानेश्वर ज्योतीभाऊ थोरवे अध्यक्ष- लायन्स क्लब ऑफ पुणे फोर्ट यांचे ते वडील आहेत.
सामाजिक, सांप्रदायिक, अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यामुळे त्यांची वेगळी ओळख होती. त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. एक मनमिळावू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले यामुळे सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
दशक्रिया विधी दिनांक १८/०४/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे. ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांचे प्रवचन होणार आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी