September 17, 2024

Samrajya Ladha

बावधन पेरीविंकलचे विद्यार्थी बनले आर्यभट्ट: स्पर्धा परीक्षेत मिळवली शिष्यवृत्ती.

पुणे :

दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आर्यभट्ट स्पर्धा परीक्षेत पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथील 42 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ग्लोबल स्टार फाउंडेशन, पुणे यांनी आयोजित केलेल्या या परीक्षेमध्ये शाळेतील शांती हजारे व जान्हवी पोळ या दोन विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळाली. तसेच शाळेतील इतर विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण झाले त्याचबरोबर दोन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवत आर्यभट्ट स्पर्धेमध्ये बाजी मारली.

अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते. या विद्यार्थ्यांना पेरिविंकल स्कूलमधून हे प्राविण्य व उज्ज्वल यश मिळवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व पाठिंबा त्यांच्या शिक्षकांकडून मिळाला.

शाळेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ.रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना हे उत्तुंग यश संपादन करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती कोल्हे पर्यवेक्षिका ऋचा हल्लूर, कल्याणी शेळके, इंदू पाटील, रश्मी पाथरकर यांचे मार्गदर्शन लाभले.