May 16, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण(पेठ जिजापुर), सुतारवाडी, सोमेश्वरवाडी परिसरात भव्य शोभ यात्रा द्वारे हिंदू नववर्षाचे स्वागत..

पाषाण :

पाषाण(पेठ जिजापुर), सुतारवाडी, सोमेश्वरवाडी परिसरात सकल हिंदू समाज आणि पंचक्रोशीतील नागरिक मिळून गुढी पाडवा निमित्त हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी शोभा यात्रेस भेट देत सहभाग घेतला.

 

शिवशक्ती चौक सूस रोड येथून शोभ यात्रेस सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्य, उंट, घोडे, बैलगाडी, देवी देवतांच्या मानवी प्रतिकृती, पुरुष व महिलांनी फेटे परिधान करून मोठ्या जल्लोषात शोभ यात्रेचा आनंद घेतला. शोभ यात्रा पेठ जिजापुर पाषाण येथिल छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ येऊन शिव वंदना आणि आरती म्हणत संपन्न झाली.

पाषाण(पेठ जिजापुर), सुतारवाडी, सोमेश्वरवाडी परिसरातील राजकीय, सामाजिक, सांप्रदायिक,क्रीडा क्षेत्रातील सर्वांनीच मोठ्या संख्येने उत्साहात हिंदू नववर्ष स्वागत शोभ यात्रेत सहभाग घेतला. शोभ यात्रेत पुरुष मंडळी सोबत महिलांनी फेटे परिधान करून मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.