May 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथिल श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने भैरवनाथ उत्सव २०२४ चे नियोजन तसेच इतर विषय संधर्भात भाविक ग्रामस्थ बैठकीचे आज नियोजन

बाणेर :

बाणेर येथिल श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने विश्वस्त सदस्यांची तातडीची बैठक ७/४/२०२४ रोजी बोलावण्यात आली होती. या बैठकीला ट्रस्ट उपाध्यक्ष राहुल पारखे, सचिव अनिकेत मुरकुटे, खजिनदार वर्षा विधाते, हिशोब तपासनीस मंगेश मुरकुटे आणि भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त उपस्थित होते.

 

या बैठकीत श्री भैरवनाथ उत्सव २०२४ चे नियोजन, श्री भैरवनाथ मंदिर जिर्णोध्दार आणि इतर बाबींवर चर्चा झाली तसेच नवनिर्वाचित विश्वस्त बबनराव चाकणकर यांची विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

या तातडीच्या बैठकीच्या अनुषागांने भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वस्तांनी माहिती देताना सांगितले की, श्री भैरवनाथ देवस्थान मंदिर बाणेर येथे परंपरेप्रमाणे आज मंगळवार दि.०९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी ठिक ०७:३० वाजता श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर व सर्व भाविक ग्रामस्थ यांची बैठक बोलाविण्यात येत आहे.
या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे :-
१. श्री भैरवनाथ उत्सव २०२४ चे नियोजन
२. श्री भैरवनाथ मंदिर जिर्णोध्दार
३ . बाणेर गायरान सर्व्हे नं. ७ व ४९/१ केस
४. इतर विषय

तरी सदर बैठकीस सर्व भाविक ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे हि विनंती भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.