May 17, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथे राहुल बालवडकर यांनी जपला सांप्रदायिक वारसा, ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांच्या कडे श्री क्षेत्र भंडारा डोंगर मंदिरास देणगी सुपूर्द..

बालेवाडी :

बालेवाडी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने हरिनाम सप्ताह व राहुल बालवडकर (पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष) यांच्या विशेष सहकार्याने दिनांक 3 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान रामायण उपासक रामकथाकार ह.भ.प.कैलास महाराज खंडागळे यांच्या राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या सोहळ्यानिमित्त विद्यावाचस्पती, प्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.

 

या सोहळ्याच्या निमित्ताने राहुल बालवडकर यांच्या वतीने 5 लाख रु.देणगी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य दिव्य मंदिरासाठी ह.भ.प. पंकज महाराज गावडे महाराजांकडे संजय बाप्पू बालवडकर, माजी नगरसेवक श्री ज्ञानेश्वर भाऊ तापकीर, अंकुश बालवडकर (माजी सरपंच), पुणे बार असो. माजी अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे, रवीभाऊ घाटे, राजेश विधाते, अमर लोंढे यांच्या शुभहस्ते सुपूर्द करण्यात आली. तसेच म्हाळुंगे येथील सुर्यमुखी गणेश मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी 1 लाख रुपयांची देणगी देण्यात आली.

राहुल बालवडकर यांनी सांप्रदायिक क्षेत्राशी असणारी आपुलकी जपत श्री क्षेत्र भंडारा डोंगर मंदिरासाठी देणगी देऊन सांप्रदायिक क्षेत्राशी असणारा वारसा जपत एक आदर्श निर्माण केला आहे : हभप पंकज महाराज गावडे

आमचा बालवडकर परिवार आणि वारकरी संप्रदाय यांचे अतूट असे नाते राहिले आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जपण्याचे काम आमचा परिवार हिरीरीने करत असतो. म्हणुनच हा वसा आणि वारसा जपत श्री क्षेत्र भंडारा डोंगर मंदिर आणि म्हाळुंगे येथील सुर्यमुखी गणेश मंदिर जीर्णोद्धारासाठी देणगी दिली व हरिनामराम कथेचे आयोजन केले : राहुल बालवडकर (उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)