October 18, 2024

Samrajya Ladha

‘वामा’ वुमन्स क्लबच्या माध्यमातून रंगाची उधळण करीत बाणेर-बालेवाडी-सुस-महाळूंगे परिसरातील महिलांनी लुटला रंगपंचमीचा आनंद..

बाणेर :

रंगपंचमी सणाच्या निमित्ताने पहिल्यांदाच बाणेर-बालेवाडी-सुस-महाळूंगे परिसरात खास बचत गटातील महिलांसाठी वामा वुमन्स क्लब च्या वतीने रंगपंचमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रंगांची उधळण केली. या कार्यक्रमाचे आयोजन सौ पूनम विशाल विधाते यांनी केलं होते

रंग पंचमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने सर्वांनी व्यक्त केले समाधान आणि कौतुक निश्चितच संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणा आणि उभारी देणारे ठरणार आहे. भविष्यात देखिल वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रमांतून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे : पूनम विशाल विधाते (अध्यक्ष वामा वुमन्स क्लब)

दैनंदिन कामामध्ये, व्यवसायामध्ये मग्न असलेल्या महिलांनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून सहभाग नोंदवत अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडवले. सर्वांनी एकमेकांना रंग लावत ह्या खेळाचा आनंद लुटला. ह्या कार्यक्रमाबरोबरच महिलांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध छटा अनुभवास मिळाल्या जेणे करून एकमेकांना ह्याचा फायदा होऊन आपापसातील ऋणानुबंध आणखी घट्ट होण्यास मदत होणार आहे.