बालेवाडी :
एसकेपी कॅम्पस च्या वतीने आणि बालेवाडी वुमेन्स क्लब च्या सहयोगाने फक्त बालेवाडी मधील सोसायटी महिलांकरिता इंटर सोसायटी वुमन्स क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा 20 एप्रिल रोजी सूरु होणार आहे. हि स्पर्धा साखळी पध्दतीने खेळविली जाणार असल्याने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला खेळाडूंना खेळाचा पुरेपूर आनंद उपभोगता येणार आहे.
या स्पर्धेची माहिती देताना एसकेपी कॅम्पस चे सचिव डॉ. सागर बालवडकर यांनी सांगितले की, एस के पी कॅम्पस आणि बालेवाडी वुमेन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एस के पी रोलिंग ट्रॉफी’ वुमन्स क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन खास बालेवाडी येथील सोसायटीतील महिलांसाठी केले असून मागील स्पर्धेला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. यावर्षी देखील होणारी हि स्पर्धा अतीशय दिमाखदार व नियोजन बद्ध पद्धतीने खेळवली जाणार असून जास्तीत जास्त बालेवाडीतील सोसायटी मधील महिला संघांनी सहभाग घेत स्पर्धेचा आनंद घ्यावा.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत : १५ एप्रिल २०२४
प्रवेश फी : ११००
नाव नोंदणी संपर्क : ८६६९९७८९०९
स्पर्धा ठिकाण : एसकेपी कॅम्पस बालेवाडी
स्पर्धा उद्घाटन : शनिवार दि. २० एप्रिल २०२४ सायंकाळी ५:३० वाजता.
More Stories
बाणेर येथे मणिपाल हॉस्पिटलमध्ये मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिर..
बालेवाडी येथे आमदार मेघनाताई बोर्डीकर यांचा मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने जाहीर सत्कार संपन्न झाला..
सुसगाव येथील सुखवाणी पॅनोरमा सोसायटी मधील गणेश मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाचा शुभारंभ समीर चांदेरे यांच्या हस्ते संपन्न..