February 4, 2025

Samrajya Ladha

सूस येथे मा. खासदार राजू शेट्टी यांनी साधला मतदारसंघातील नागरिकांशी संवाद..

सूस :

सूस येथे मा. खासदार राजू शेट्टी यांनी पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहारातील हातकणंगले मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींशी संवाद साधला. यावेळी अनेक विषयांवर चर्चा होऊन मतदारांच्या समस्या अडचणी समजून घेतल्या गेल्या. उपस्थित शेतकरी, कामगार, कष्टकरी यांनी आपल्या अडचणी मांडल्या.

 

यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या विरोधातील सरकार असून उद्योगपतींची हजार कोटीचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचे छोटीशी कर्ज माफ करण्यासाठी, नवीन योजना आणून देण्यासाठी, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कुचकामी ठरलेले आहे. म्हणून बदल घडविण्यासाठी मतदानाला यावे.

याप्रसंगी राजू शेट्टी साहेब व अध्यक्ष अमरसिंह कदम, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर. बाप्पू कारंडे , ॲड. योगेश पांडे, सुदिन खोत, स्वाभिमानी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष, दिलीप बालवडकर, ससगाव चे माजी सरपंच नारायण चांदेरे, मा. उपसरपंच सुहास भोते, चंद्रकांत पाटील, सा.कार्यकर्ते अशोक गु बालवडकर, संदीप बालवडकर, हनुमंत बालवडकर, उमेश सत्रे, अमित कुडले, मारुती गोरडे (खेड तालुका अध्यक्ष(, काशिनाथ दौंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.