बालेवाडी :
राजाभाऊ गुडदे यांच्या ७४ व्या जन्मदिवस निमित्त बालेवाडी येथील राजाभाऊ गुडदे फाउंडेशन च्या वतीने आणि इंटेग्स क्लाऊड कंपनीच्या सहयोगाने “नव निर्माण -३” हा उपक्रम पदमश्री सिंधुताई सपकाळ यांच्या कुंभारवळण येथील ममता बाल सदन आश्रमाला भेट देऊन राबवण्यात आला.
संस्थेतील ९० अनाथ निराधार मुलींना शालेय स्टेशनरी, स्पोर्टस किट, सॉफ्ट टॉईज, खेळणी, सॅनिटरी नॅपकिन्स, होळीसाठी रंग, पिचकारी, शैक्षणिक चार्ट, गोष्टींची पुस्तके देण्यात आली. प्रश्नमंजुषा घेऊन मुलींना बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमात गावात स्वछता अभियान करण्यात आले. दीपक दादा गायकवाड, स्मिता पानसरे यांनी संस्थेविषयी माहिती दिली आणि त्यांच्या हस्ते “नव निर्माण ३” कार्यक्रमाचे सर्टिफिकेट्स वाटण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सारंग चव्हाण हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण गुडदे, संगीत गुडदे, अनिमेश गुडदे, गोपाळ खडसान, श्रीकांत साठे, धनंजय गवारे, दर्शना गवारे, मनोज जोशी, गिरीजा जोशी, अमित शहा, तुलसीदास तोरडमल, गायत्री कुलकर्णी, राहुल सदावर्ते, अशोक शिंदे, शीतल दसलवार, निषाद गुडदे, चिन्मय जोशी, तुषार वडीलें, अक्षय मालुसरे, राहुल दुसाने, स्वप्नील ढसाळ, अमोल बगडिया, नेलसन धांडे, निखिल नरवाडे, राहुल बाकडे, प्रसाद जाधव, डॉक्टर सविता गिरबिडे, राहुल मेनन, पंकज बोरोले, निधी बोरोले, मृणाल जोशी, गोरल गवारे, अश्विन अपराजित, मुरली बारीकर, सचिन साळुंके, हुजेफा कमरी, सौरभ मालकवढेकर, हितेश जोशी, मयूर महाले, प्रवीण मोरे, वृषाली क्षीरसागर, रजत वैद्य, अनुष्का शुक्रे, ओमकार ओरगंटीवार, दिलीप जाधव, मनोज माने, स्वप्नील अडगळे, मोनाली साळुंके, योगेश दुकाले, स्वरा साळुंके यांनी उपक्रमामध्ये सहभाग घेतला.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..