November 21, 2024

Samrajya Ladha

कासार आंबोलीच्या सरपंच रेशमा गायकवाड पेरिविंकल स्कूल तसेच पत्रकार संघाच्या वतीने सन्मानीत

पिरंगुट :

कासार आंबोली ग्रामपंचायत सरपंच पदी सौ रेश्मा गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान पेरिविंकल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल तसेच मुळशी तालुका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष विनोद माझीरे यांच्या हस्ते करण्यात आला. सौ गायकवाड या उच्चशिक्षित असून गावातील शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणार असून तसेच गावचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेचे राम गायकवाड हे तालुक्यातील राजकारणात मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात त्यांचे वडील काही भागोजी गायकवाड यांनी १९७५ साली कासार आंबोलीचे सरपंच पद भूषविले होते त्यानंतर आता त्यांच्या वहिनी रेश्मा गायकवाड यांची सुद्धा सरपंच पदी वर्णी लागली आहे गायकवाड कुटुंबाचे तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठे योगदान असून गावच्या विकासामध्ये मोठा सहभाग आहे.

याप्रसंगी मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड, हिमालय नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक विनोद माझीरे,माजी सरपंच गणेश सुतार, ग्रामविकास अधिकारी डि.बी.क्षिरसागर,ग्रामपंचायत सदस्य प्रीती शिंदे ,माधुरी धुमाळ, सुनील शिंदे, भरत गायकवाड ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.