September 17, 2024

Samrajya Ladha

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात वार्षिक क्रिडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात वार्षिक क्रिडा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या प्रसंगी श्री सतिश देवकाते, डेप्युटी डायरेक्टर आॅफ रजिस्टार, कांदिवली, मुंबई महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह, पी ई सोसायटी, डाॅ प्रकाश दिक्षित, उपकार्यवाह, पी ई सोसायटी व प्राचार्य डाॅ संजय खरात उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र गीत व माॅडर्न गीताने झाली. विद्यार्थीनींनी योगाचे प्रात्यक्षिक सादर केले.

प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले सगळ्या क्षेत्रात चमकणर्या विद्यार्थ्यांविषयी आम्हांला सार्थ अभिमान आहे. सगळ्याच क्षेत्रात चमकणारे आमचे विद्यार्थी हा आमचा एक कौतुकाचा विषय आहे. पी एम उषा ची ५ करोडची ग्रँट मिळवणारे मिळवणारे पुणे जिल्ह्यातील हे एकमेव महाविद्यालय आहे.

या प्रसंगी बोलताना श्री सतिश देवकाते( हाॅकी पटु) म्हणाले, “ऑलिम्पिक खेळलेले गुरु मला लाभले. खुप कमी जण नॅशनल लेव्हलला स्पोर्टस् खेळतात. तुम्ही खेळा पण स्वतःच्या फिटनेस साठी. करिअरसाठी तुमची आवड ओळखा व त्यामध्ये करिअर करा कारण आवडत्या गोष्टीत करिअर करताना तुमचा विकास लवकर होईल. ध्येय नक्की करा पण खेळ मात्र आयुष्यभर चालु ठेवा.”

बक्षिस नाही मिळाले तर नाउमेद होऊ नका नो चा अर्थ नेस्क्ट अपोर्चुनिटी असा घ्या आणि यशस्वी व्हा असे प्रा सुरेश तोडकर म्हणाले.

यानंतर २१२ गुणवान विद्यर्थ्यांना पारितोषिक वितरण केले गेल. यामधे राहुल वाळे या Msc comp sci च्या विद्यार्थ्याला उत्कृष्ठ खेळाडू २०२३-२४ चा पुरस्कार दिला गेला. आंतर महाविद्यालयीन साॅफ्ट बाॅल मध्ये उपविजयी तसेच नेट बाॅल स्पर्धेत तृतीय क्रमांक तसेच विभागीय बेसबॉल स्पर्धेत पुणे शहराचे प्रतिनिधित्व केलेले आहे. कै माधव सदाशिव गोळविलकर पारितोषिक, केशव बळीराम हेडगेवार पारितोषिक ही त्याला मिळाले आहे.

महाविद्यालयाची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून एस वाय बी ए सायकाॅलाॅजी ची विद्यार्थिनी अनुष्का बोराडे ला जाहीर झाले. जी. व्ही. मालवणकर नॅशनल शूटिंग चँपिआनशिप मध्ये तिला गोल्ड मेडल मिळाले आहे. कै केशव बळीराम हेडगेवार स्मरणार्थ असलेले पारितोषिकही तिला जाहीर झाले आहे.

हा कार्यक्रम डाॅ. दिपक शेंडकर, क्रीडा विभाग प्रमुख, यांच्या समन्वयाने पार पडला. त्यांना प्रा. शाम नागरगोजे व विद्यार्थी राहुल वाळे एमस्सी कम्पुटर सायन्स यांनी मदत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाॅ. प्रतिभा राव यांनी केले.या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कार्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.