पुणे :
ज्येष्ठ पत्रकार सुनील माने यांनी आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. मोदी बागेतील शरद पवारांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जयदेवराव गायकवाड, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रवादी लिगल सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष अॅड. भगवानराव साळुखे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अनुभवी नेतृत्वातच महाराष्ट्राचा आणि पुणे शहराच्या शाश्वत विकास होऊ शकतो ही माझी धारणा असल्याने मी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला : सुनील माने (ज्येष्ठ पत्रकार)
सामाजिक, राजकीय, पत्रकारितेतील माझ्या अनुभवाचा पुणे शहर आणि राज्याच्या विकासासाठी फायदा व्हावा यासाठी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सुनील माने यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितले.
यावेळी सुनील माने यांच्या सोबतच माजी नगरसेवक आरिफ बागवान, मा.पंचायत समिती सदस्य सुनील खेडेकर यांनीही आज शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
More Stories
बाणेर येथे मणिपाल हॉस्पिटलमध्ये मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिर..
बालेवाडी येथे आमदार मेघनाताई बोर्डीकर यांचा मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने जाहीर सत्कार संपन्न झाला..
सुसगाव येथील सुखवाणी पॅनोरमा सोसायटी मधील गणेश मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाचा शुभारंभ समीर चांदेरे यांच्या हस्ते संपन्न..