December 3, 2024

Samrajya Ladha

सूसगाव येथे ‘BBSM सोसायटी अंतर्गत क्रिकेट लीग’ खेळाडूंना टी शर्ट वाटप संपन्न, सोसायटीतील महिला पुरूष संघ खेळण्यासाठी सज्ज..

सूसगाव :

सूसगाव येथे युवा नेतृत्व पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग तिसऱ्या वर्षी बाणेर, बालेवाडी, सूस, महाळुंगे परिसरातील सोसायटी मधिल नागरिकांसाठी ‘BBSM सोसायटी अंतर्गत क्रिकेट लीग’ २२ मार्च ते २ एप्रिल दरम्यान होणार असून स्पर्धेतील खेळाडूंना टी शर्ट वाटप करण्यात आले.

संपूर्ण लीग दरम्यान प्रत्येक संघात एकजुट आणि संघ भावना कायम रहावी यासाठी BBSM क्रिकेट लीगमधे सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या संघातील २ हजारहून अधिक स्पर्धकांना पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबूराव चांदेरे, राहुलदादा बालवडकर, माजी नगरसेविका रोहिणीताई चिमटे, BBSM प्रीमियर लीग संयोजन समितीचे अध्यक्ष दत्ताभाऊ भोरे, मा नगराध्यक्ष पूजा किरण चांदेरे यांच्या उपस्थिती मध्ये टीशर्ट देण्यात आले.

यावेळी माणिकतात्या गांधिले, अर्जून शिंदे, सुखदेव चांदेरे, महेश पाडाळे, अर्जून ननावरे, संजय ताम्हाणे, चंद्रकांत काळभोर, रामदास धनकुडे, युवक शहर कार्याध्यक्ष मनोज बालवडकर, चेतन बालवडकर, अशोक माने, निखिल धनकुडे , महादेव चाकणकर, शेखर सायकर, अजिंक्य निकाळजे, ओंकार रणपिसे , सौ.सुषमा ताम्हाणे, सौ.प्राजक्ता ताम्हाणे, सौ.सायली शिंदे, सौ.वैशाली तापकिर, आरती शेळके, सौ.सोनम चाकणकर, सौ.स्वाती बालवडकर, तनुजा जाधव, ऐश्वर्या शिंदे, कोमल तांबे, सौ. आशा शिंदे, सौ.अश्विनी शेंडगे यावेळी यांच्यासह विविध सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.