May 26, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी येथे श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांनी दिवाळी साजरी….

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी येथे अयोध्येतील प्रभू श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विठ्ठल सेवा मंडळ, महिला भजनी मंडळ आणि सचिन दळवी सोशल फाउंडेशन च्या वतीने सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण आणि पुर्ण दिवसभर विविध कार्यक्रम राबवत दिवाळी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला आमदार मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील उच्चतंत्र शिक्षण,वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी भेट देत सर्वांचा उत्साह वाढविला.

 

पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे काकडा आरतीने सुरूवात कऱण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ श्री राम मूर्ती पूजन करण्यात आले. हभप श्री गणेश महाराज कार्ले यांचे किर्तन तसेच कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. महिलांचे भजन, प्रसाद वाटप आणि सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाआरती आणि आतिषबाजी करत दिवाळी साजरी करण्यात आली.

यावेळी सोमेश्वरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.