November 21, 2024

Samrajya Ladha

बालेवाडीतील राजाभाऊ गुडदे फाऊंडेशन “बाल विकास – २” उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप…

बालेवाडी :

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बालेवाडी, पुणे येथील राजाभाऊ गुडदे फाऊंडेशन तर्फे “बाल विकास – २” उपक्रम राबविण्यात आला. बाणेर – बालेवाडीतील विविध भागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी विविध साहित्य देण्यात आले.

राजाभाऊ गुडदे फाऊंडेशन तर्फे “बाल विकास – २” उपक्रमांतर्गत गरजु विद्यार्थ्यांना मदत केली जाते. बाणेर – बालेवाडीतील विविध भागात असणाऱ्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणी काही अंशी कमी करता याव्यात या हेतूने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले : किरण संगीत गुडदे(अध्यक्ष राजाभाऊ गुडदे फाऊंडेशन)

या उपक्रमासाठी माइकल थेवर, अमित शहा, आत्मज वाकडे, एकता पंजवानी, अश्विन अपराजित, वसीम नदाफ, अक्षय मालुसरे, धनंजय गवारे यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. किरण संगीत गुडदे व अनिमेश गुडदे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.