सूस :
भाजपा पुणे शहर चिटणीस लहू बालवडकर यांच्यावतीने प्रभागातील नागरिकांसाठी नववर्षाच्या निमित्त तयार केलेली ‘दिनदर्शिका २०२४’ चे अनावरण तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
दिनदर्शिकेच्या प्रकाशनाची माहिती देताना भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांनी सांगितले की, दिनदर्शिका ही आपल्या जीवनाची अविभाज्य घटक असून वर्षाच्या 365 दिवसांचा आलेख ज्यामध्ये सन, सणावळ, विविध तिथि आणि आवश्यक असणारी सर्व माहिती उपलब्ध होत असते. ही माहिती दिनदर्शिकेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहे. परिसरात जास्तीत जास्त नागरिकांना ही दिनदर्शिका पोचविण्याचा प्रयत्न राहील : लहू बालवडकर(चिटणीस भाजपा पुणे शहर)
दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील लहू बालवडकर यांना शुभेच्छा देत म्हणाले की, समाजासाठी विविध उपक्रम राबवित लोकांना सखोल माहिती प्राप्त व्हावी या सुरेख उद्देशाने दिनदर्शिकेचे वाटप लहू बालवडकर यांच्या माध्यमातून होत आहे. हा एक स्तुत्य उपक्रम आहे.
यावेळी माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नालीसायकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा ओबीसी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रल्हाद सायकर, भाजपा कोथरूड उत्तर विधानसभा अध्यक्ष सचिन पाषाणकर, सरचिटणीस सचिन दळवी, प्रकाश बालवडकर, युवा मोर्चा अध्यक्ष रोहन कोकाटे, उपाध्यक्ष अनिकेत चांदेरे आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
नवीन समाविष्ट ३४ गावांच्या ९ नियुक्त लोकप्रतिनिधी मध्ये बाबुराव चांदेरे यांची वर्णी, महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश जारी..
सूसगाव येथील बेलाकासा सोसायटीजवळ बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या वसाहतीत आग, वीस घरे जळून खाक, तीन सिलिंडर चे स्फोट…
पेरिविंकल च्या सुस शाखेत प्री -प्रायमरीतील चिमुकल्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न!!!