पुणे :
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची! या उक्तीप्रमाणे गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसंन्नता, शांतता आणि समृद्धी सर्वांना मिळावी या उद्देशाने दिवंगत आमदार विनायक निम्हण यांनी १९९९ मध्ये गोधन पूजनाची व्यवस्था करण्याची परंपरा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सुरू केली. त्यांच्या पश्चात ही परंपरा त्यांचे चिरंजीव,माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सुरू ठेवल्याने, महिलांना गोधन पूजन करण्याचे समाधान मिळाले.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सोमेश्वर मंदिर सोमेश्वरवाडी, समृद्धी गणेश मंदिर बोपोडी, परिहार चौक औंध, सानेवाडी मैदान औंध, दास ऑटोमोबाईल्स शिवाजीनगर, श्रीमंत एस.के.कुसाळकर शेठ मित्र मंडळ जनवाडी – गोखलेनगर, पांडवनगर पोलीस चौकी शेजारी वडारवाडी अशा विविध ठिकाणी गोधन पूजन करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गोधन पूजन करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…