October 18, 2024

Samrajya Ladha

मराठा समाजाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे उद्या ठिय्या आंदोलन…

पुणे :

मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जालना अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे, बोपोडी, छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील मराठा समाजाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे मंगळवार दिनांक 31/10/2023 रोजी सकाळी 9:30 पासून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत प्रत्येक गावांमधील नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात मराठा समाजातील महिला वर्गासह लहान थोर सर्वच सहभागी होऊन मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविणार आहे. गावोगावी नागरिक स्वयंस्फूर्तीने एकत्र येत असून ठिय्या आंदोलनाचे नियोजन करत आहेत.

पाषाण, बाणेर परिसरातील आसपासच्या सर्वच गावांमधून राजकीय नेत्यांना गावबंदी जाहीर करण्यात आली असून मराठी समाजाच्या भावनांचा विचार करत सर्व नेत्यांनी आपले राजकीय कार्यक्रम टाळावेत तसेच राजकीय नेत्यांना बोलावून कुठलेही कार्यक्रम घेऊ नये असे आव्हान करण्यात आले आहे.