June 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर परिसरातील ए. पी. आय विशाल जाधव यांचा आशियाई पिकलबॉल गेम्स मध्ये सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी केला सत्कार..

बाणेर:

बाणेर परिसरात वास्तव्यास असणारे मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले ए. पी. आय श्री.विशाल किसनराव जाधव यांनी तैवान येथे संपन्न झालेल्या आशियायी पिकलबॉल गेम्स २०२३ मध्ये व्यक्तिगत क्रिडाप्रकारात सुवर्ण पदक व सांघिक क्रिडा प्रकारात रौप्य पदक जिंकून भारत देशाचा तिरंगा फडकावला म्हणून मा.नगरसेविका स्वप्नाली सायकर व भाजपा महाराष्ट्र राज्य ओबीसी सरचिटणीस प्रल्हाद सायकर यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

 

आपल्या परिसराील ए. पी. आय श्री.विशाल जाधव यांनी आशियायी पिकलबॉल गेम्स २०२३ मध्ये व्यक्तिगत क्रिडाप्रकारात सुवर्ण पदक व सांघिक क्रिडा प्रकारात रौप्य पदक जिंकून अभिमानास्पद कामगिरी करत देशाचे तसेच आपल्या परिसराचे नाव उंचावले आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करत त्यांचा यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या : माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर

यावेळी तुषार चाकणकर, सचिन सायकर, श्रीकांत सायकर, मयुर लखावत, सतीश ढेपे, मंगेश बालवडकर, तुषार बालवडकर, सच्चिदानंद सायकर, काशिनाथ कलशेट्टी, श्रीकांत भांडवलकर, संदीप तुपे, जीवन उफाडे, बालाजी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.