September 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुसगावमध्ये आज दहीहंडी उत्सव निमित्त श्री कानिफनाथ महाराज पुरस्कार वितरण सोहळा..

सुसगाव :

अखिल सुसगाव दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सुसगाव येथे श्री कानिफनाथ महाराज पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा आज शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता चौकाचा राजा मित्र मंडळ, चौक-सुसगाव येथे होणार आहे.

 

या कार्यक्रमाला रोजगार हमी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड जिल्हा भरतशेठ गोगावले तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिनभाऊ अहिर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सिनेअभिनेत्री प्राची पालवे, सर्किटनाना व शेवंताबाई तसेच सिनेअभिनेत्री पूजा सावंत यांची उपस्थिती असणार आहे.

यावेळी सामाजिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना श्री कानिफनाथ महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कर्ते म्हणून श्री. रामभाऊ चांदेरे, श्री. कान्हूभाऊ साळुंके, श्री. एकांश ससार व श्री. महादेव ससार यांचा समावेश आहे.

या भव्य सोहळ्याचे आयोजन श्री. बाळासाहेब चांदेरे (शिवसेना जिल्हाप्रमुख, पुणे तथा मा. सभापती, पं.स. मुळशी) यांच्या वतीने करण्यात आले आहे. सुसगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.